24.2 C
Maharashtra
Saturday, December 21, 2024

संगमनेर विधानसभेत विखे विरुद्ध थोरात सामना होणार का? भाजपाचा मोठा निर्णय

संगमनेर: संगमनेर विधानसभा मतदार संघात काँग्रेस जेष्ठ नेते विद्यामान आमदार बाळासाहेब थोरात आणि माजी खासदार सुजय विखे पाटील यांच्यात लढत होणार असल्याची चर्चा चांगलीच रंगली होती, त्यासाठी सुजय विखे इच्छुकही होते. पण भाजप सुजय विखेंना उमेदवारी देण्यास अनुकूल नसल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे, त्यामुळे संगमनेर विधानसभेत थोरात विरुद्ध विखे लढतीची शक्यता मावळली आहे. तरी सुजय विखे अपक्ष लढणार असल्याची चर्चा देखिल जोर धरत आहे.

विखे विरुद्ध थोरात हा नगर जिल्ह्यातील राजकीय संघर्ष सर्वश्रृत आहे. एकमेकांना निवडणुकीत पराभूत करण्यासाठी दोन्ही नेत्यांकडून प्रयत्न केले गेले, पण त्यांनी आजवर एकमेकां विरोधात निवडणूक लढवणं टाळलं होतं. यंदा मात्र संगमनेर विधानसभा मतदार संघात बाळासाहेब थोरातांना सुजय विखेंकडून आव्हान दिलं जाण्याची शक्यता वर्तवली जात होती. कारण सुजय विखे संगमनेर विधानसभा लढवण्यास इच्छुक होते. तसेच त्यांनी अनेकदा जाहीर बोलून देखिल दाखवले होते.

संगमनेर विधानसभेतून निवडणूक लढवण्याच्या मुलाच्या इच्छेला पिता राधाकृष्ण विखे पाटलांनी दुजोरा दिला होता. तर बाळासाहेब थोरातांनी सुजय विखेंचं आव्हान स्वीकार संगमनेरात आले तर स्वागतच करु असं देखिल म्हटलं होतं.

सुजय विखेंच्या संगमनेर विधानसभा क्षेत्रातून आग्रही असायला लोकसभा निवडणुकीची पार्श्वभूमी आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत सुजय विखेंचा निलेश लंकेंनी पराभव केला, त्यामध्ये बाळासाहेब थोरांतानी महत्वाची भूमिका बजावली होती. लोकसभेतील पराभवाचा वचपा काढण्यासाठी सुजय विखे संगमनेरमधून विधानसभा लढवणार असल्याची चर्चा रंगली होती, पण आता भाजपनं त्याला ब्रेक लावला आहे.

विधानसभेसाठी सुजय विखेंच्या नावाचा भाजपकडून विचार करण्यात आला नसल्याचं सूत्रांनी सांगितलंय. संगमनेरची जागा महायुतीत शिवसेनेकडे आहे, त्यामुळे ही जागा शिवसेनेला सोडली जाणार आहे. तसंच एकाच घरात 2 तिकीट नको म्हणून भाजपनं सुजय विखेंच्या नावाचा विचार केला नसल्याचं बोललं जातंय. सुजय विखे भलेही संगमनेर विधानसभा लढवणार नसले तरी थोरातांना पराभूत करण्यासाठी त्यांचा प्रयत्न असणार आहे. लोकसभा निकालानंतर विखे पिता पुत्र संगमनेर मध्ये सक्रीय झाले असून वर्चस्व वाढवताना दिसत आहेत.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
22,100SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles