18.1 C
Maharashtra
Tuesday, December 17, 2024

मुख्यमंत्री काय यंदा आमदार सुध्दा होणार नाहीत! सुजय विखेंचा थोरातांवर निशाना

संगमनेरः आजची सभा हा फक्त ट्रेलर आहे. या तालुक्यात परीवर्तन करण्यासाठी युवकांनी मागे न राहाता तालुक्यातील दहशत झुगारून परीवर्तनासाठी पुढे आले पाहीजे. (Sangamaner Vidhan Sabha) तालुक्यातील ठेकेदारी संस्कृती तुमचा विकास करू शकणार नाही आशा शब्दात डॉ. सुजय विखे पाटील (Sujay Vikhe Patil) यांनी आ.बाळासाहेब थोरात (MLA Balasaheb Thorat) यांच्यावर निशाणा साधला.मुख्यमंत्री होण्याचे स्वप्न पाहाणारे आमदार सुध्दा यंदा होवू शकणार नसल्याचा टोला त्यांनी लगावला.

तळेगाव येथे आयोजित करण्यात आलेल्या युवा संकल्प मेळाव्यात डॉ. सुजय विखे पाटील यांनी थोरातांच्या चाळीस वर्षाच्या कार्यपध्दतीवर जोरदार टिका केली.

वर्षानुवर्ष या भागातील महीलांच्या डोक्यावरील हांडा उतरवू न शकलेले कोणत्या विकासाची भाषा करतात असा प्रश्न करून या तालुक्यात फक्त नातेबाईकांसाठी राजकारण झाले. नाते ठेकेदार आणि जमीनीचा ताबा मिळवणारे एवढीच ओळख पद वाटताना दाखवली जाते. पण तळेगाव निमोण भागातील तरुणांनी या मातीची शान राखून परीवर्तन केले. असेच परीवर्तन आता येणा-या विधानसभा निवडणुकीत करायचे असून दोन दिवसात पक्षाचा निर्णय होवून संगमनेर विधानसभा मतदार संघाची जागा भाजपाच्या वाट्याला येईल असा विश्वास सुजय विखे यांनी व्यक्त केला.

चाळीस वर्षे तालुक्याला मोठी पद मिळाली. पण निधी आणता आला नाही. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या माध्यमातून तळेगावला 44 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाला. निळवंडे धरणाचे पाणी आले. अनेक वर्ष फक्त विखे पाटील परीवारावर टिका केली. पण साईबाबांचे आशीर्वादाने विखे पाटील कुटूबातील मुलगाच जिल्ह्याचा पालकमंत्री झाला आणि निळवंड्याचे (Nilwande Dam) पाणी आणून दाखवले.

आता भोजापूर चारीचे पाणी सुध्दा विखे पाटीलच आणून दाखवतील असा दावा त्यांनी करताना पुढची चाळीस वर्षे तालुक्यातील युवकांच्या उज्वल भवितव्याची असतील आशी ग्वाही त्यांनी दिली.

अनेक वर्ष एकाच घरात सता असल्याचा आरोप करून आता तुमची मनमानी बास झाली. आजची सभा तालुक्यातील परीवर्तनाची नांदी आहे. आमचा कार्यकर्ता शिवरायांचा मावळा आहे. पाकीट संस्कृतीत वाढलेला नाही. माझ्या कार्यकर्ताला काही करण्याचा प्रयत्न कराल तर येथेच तुम्हाला गाडल्या शिवाय राहणार नाही आशा तिखट शब्दात त्यांनी थोरातांच्या दहशतीचा समाचार घेतला.


सुजय विखे पाटील यांचे लोहारे कासारे पासून जोरदार स्वागत करण्यात आले. यावेळी जेसीबीतून फुलांची उधळण करण्यात आली तर ढोल ताशांच्या आणि फटाक्यांच्या आतीषबाजीत कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला.

यशोधनच्या सूत्रांवर विश्वास ठेवू नका

सुजय विखे यांना तिकीट नाकारले आशा बातम्या जाणीपुर्वक पेरल्या. कोणत्या सूत्रांची माहीती आहे तुम्हाला माहीत आहे. यशोधनच्या सूत्रांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन करून संगमनेरचा मतदार संघ भाजपाला मिळणार असल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
22,100SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles