शिर्डी : कोपरगाव विधानसभा मतदार संघाचे भाजपाचे दावेदार विवेक कोल्हे यांना थांबवण्यात पक्षश्रेष्ठींना यश आल्यानं उत्तरनगर जिल्ह्यात राजकीय समीकरणे बदलली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. भाजपाच्या माजी आमदार स्नेहलता कोल्हे आणि विवेक कोल्हे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या मध्यस्थीने दिल्लीत जावून अमित शाहांची भेट घेतली. याभेटी नंतर आता कोल्हे भाजपात राहून महायुतीचा धर्म पाळतील असा बोलल जात असल्यानं विखे विरुद्ध कोल्हे हा सुरु असलेला संघर्ष देखिल शमन्याची शक्यता निर्माण झाली असून शिर्डी विधानसभा मतदारसंघात राधाकृष्ण विखे पाटलांचा मार्ग सुखकर झाला आहे.
कोपरगाव विधानसभा मतदारसंघात कोल्हे विरुद्ध काळे हा तीन पिढ्यांचा संघर्ष सर्वश्रुत आहे. शंकरराव कोल्हे विरुद्ध शंकरराव काळे, बिपीन कोल्हे विरुद्ध अशोक काळे आणि आता विवेक कोल्हे विरुद्ध आशुतोष काळे असा तिस-या पिढीत संघर्ष सुरु होता. विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभुमीवर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे विद्यमान आमदार आशुतोष काळे विरुद्ध विवेक कोल्हे यांनी दंड थोपाटले होते. जवळपास तीन वर्षापासून दोन्ही बाजूने जोरदार राजकीय आरोप प्रत्यारोप सुरु होते. मात्र काळे आणि कोल्हे दोन्ही महायुतीचे घटक पक्षात असल्यानं कोपरगाव विधानसभा मतदारसंघात मोठा पेचप्रसंग निर्माण झाला होता.
यात आशुतोष काळेंची उमेदवारी राष्ट्रवादी कडून निश्चित करण्यात आल्यानं कोल्हे नाराज झाले. दरम्यानच्या काळात कोल्हे शरद पवारांच्या संपर्कात असून तुतारी फुंकणार अशी चर्चा सुरु झाली. तसेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून मशाल हाती घेणार ह्या शक्यता देखिल राजकीय वर्तुळात वर्तवण्यात आली होती. त्याचबरोबर मध्यांतरीं काळात विवेक कोल्हे यांनी कॉंग्रेसच्या बाळासाहेब थोरात यांच्या मदतीने विखे पाटलांकडील गणेश सहकारी साखर कारखान्याची सत्ता आपल्याकडे खेचून आणली. तेव्हा विखे विरुद्ध कोल्हे या संघर्ष आणखीच वाढत गेला. शिर्डी विधानसभा मतदारसंघात कॉंग्रेस कडून विवेक कोल्हे विखे विरुद्ध निवडणूकीच्या रिंगणात उतरणार अशी चर्चा देखिल रंगली होती. मात्र ऐन निवडणूकीच्या तोंडावर कोल्हे यांची नाराजी दूर करण्यात आणि त्यांना निवडणूक लढवण्यापासून थांबवण्यास भाजपा पक्षश्रेष्ठींना यश आल आहे.
गेल्या पंधरा दिवसापासून माजी आमदार स्नेहलता कोल्हे आणि विवेक कोल्हे यांच्या मुंबई दिल्ली वा-या सुरु आहेत. भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे , देवेंद्र फडणवीस यांच्यासह इतर पक्षश्रेष्ठी सोबत बैठका होवून आज दिल्लीत अमित शाहासोबत अंतिम बैठक पार पडली असून यात कोल्हेंच राजकीय पुर्नवसन केले जाईल अशा निर्णयावर कोल्हे थांबल्याच सांगीतल जात आहे. विधानसभेला कोल्हे भाजपातच राहणार असून महायुतीत बरोबर पक्षनिष्ठेचा धर्म पाळणार आहेत. त्यामुळे शिर्डी विखेंना कोल्हेंकडून होत असलेला विरोध देखिल मावळला अस म्हटलं जात आहे.
शिर्डी विधानसभा मतदारसंघात विद्यमान महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या विरोधात थोरात आणि कोल्हे एकत्र येत प्रभावती घोगरे यांना उतरवणार असल्याच चित्र होत मात्र आता केंद्रस्तरीय नेत्यांशी झालेल्या बैठकीमुळे कोल्हे विखे यांची पुन्हा एकदा दिलजमाई होवू शकते. यामुळे कॉंग्रेसकडून इच्छुक असलेल्या प्रभावती घोगरे यांना फक्त थोरातांच्याच भरवशावर राहव लागेल अस सध्या तरी दिसून येत आहे. त्यामुळे राधाकृष्ण विखे पाटलांच्या मार्गावरील मोठा अडसर दूर झाला असून याचा मोठा फायदा विखे पाटलांना निवडणूकीत होवू शकतो.
शेवटी भाजपच्या स्नेहलता कोल्हे यांनी जरी दोन पावलं मागे घेण्याचे सुतोवाच केले असेल तरी विवेक कोल्हे स्वतः काय भुमिका घेतात हे पाहण महत्वाच ठरणार आहे. भाजपाकडून कोल्हेंच काय राजकीय पुर्नवसन केले जाणार आहे हे लवकरच स्पष्ट होईल. कोल्हेंच्या भुमिकेवर कार्यकर्ते काय निर्णय घेतात याकडे आता कोपरगावकरांच लक्ष लागल आहे.