19 C
Maharashtra
Friday, December 20, 2024

पुणे कार अपघात पकरणी अजित पवारांचे मोठे वक्त्व्य

पुणे : पुण्यातील वेदांत अग्रवाल अपघात प्रकरण राज्यभर चर्चेत आहे. पोर्ष या स्पोर्ट्स कारने त्याने टू-व्हिलरवर असलेल्या तरूण-तरूणीला धडक दिली. दोन जणांना जागेवरच संपवणाऱ्या वेदांत याची अवघ्या 15 तासांमध्ये जामिनीवर सुटका झाली. त्यामुळे लोकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून वेदांत याच्यावर कारवाई करण्याची मागणी केली. त्यानंतर पोलीसही अॅक्शन मोडवर आले आणि वेदांतच्या वडिलांना म्हणजेच विशाल अग्रवाल यांना अटक केली. हे प्रकरण दाबण्यासाठी अजित पवार गटाचे आमदार सुनील टिंगरे यांच्यावर आरोप केले गेले. मात्र टिंगरे यांनी हे आरोप बदनामी करण्यासाठी होत असल्याचं म्हटलं. अशातच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या प्रकरणाबाबत पुणे पोलीस आयुक्तांना फोन करत चौकशी करून योग्य कायदेशीर निर्णय घ्या असे आदेश दिले आहेत.

काय म्हणाले अजित पवार?

पुण्यातील अपघात प्रकरणामध्ये आमचा काहीही संबंध नाही. माझ्या मुलाने असं कृत्य केलं असतं तरी कारवाईचे आदेश दिले असते, असं अजित पवार म्हणाले. अपघात प्रकरणाची चौकशी करून योग्य कायदेशीर निर्णय घ्या असे आदेशही पवारांनी दिले आहेत. राज्य उत्पादन शुल्क विभागाने या प्रकरणातील  दोन्ही पब सील केले आहेत. आतापर्यंत या प्रकरणात चार आरोपींना अटक करण्यात आली आहे.

या प्रकरणातील आरोपींना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. ब्लॅक आणि कोझी या क्लबचे मालक आणि मॅनेजर यांना तीन दिवसांची कोठडी सुनावली गेली आहे. आज त्यांना कोर्टात नेण्यात आलं होतं. तर वेदांतचे आरोपी विशाल अग्रवाल याला उद्या कोर्टात हजर करण्यात आला आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
22,100SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles