शिर्डी | बॉलीवूड फिटनेस गर्ल शिल्पा शेट्टी (Bollywood Actress Shilpa Shetty Visited Shirdi Sai Temple) आपल्या संपूर्ण कुटुंबासह शुक्रवारी शिर्डीच्या साईबाबा समाधीचे दर्शन घेण्यासाठी पोहचली. नेहमीप्रमाणे आपल्या आकर्षक आणि पारंपरिक स्टाइलने शिल्पाने चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं. या वेळी तिने गुलाबी रंगाचा पारंपरिक ड्रेस परिधान केला होता, जो तिच्या सोज्वळतेचं प्रतीक ठरत होता.
यावेळी तिच्या सोबत पती राज कुंद्रा, मुलगा विहान आणि मुलगी समीक्षा मातोश्री सुनंदा शेट्टी आणि राज कुंद्रा यांची बहीण रिना ही देखील उपस्थित होती.
दरम्यान साईबाबा संस्थानच्या वतीने शिल्पा शेट्टी आणि संपूर्ण कुटुंबियांचा संस्थांचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी भीमराज दराडे यांनी सन्मान केला.
शिल्पा शेट्टीनं धुपारती नंतर शिर्डीच्या साईबाबा मंदिरात त्यांनी हजेरी लावली. मंदिरात प्रवेश करतानाच अनेक भाविक आणि चाहत्यांनी तिचं जोरदार स्वागत केलं. शिल्पाने समाधीवर चादर अर्पण करत साईबाबांची प्रार्थना केली. साधारणतः प्रत्येक वर्षी ती साईबाबांच्या दर्शनासाठी येत असते, मात्र यंदा संपूर्ण कुटुंबासह येऊन तिच्या भक्तिभावाचं वेगळंच दर्शन घडवलं.
शिर्डीच्या रस्त्यांवर शिल्पाला पाहण्यासाठी चाहत्यांनी मोठी गर्दी केली होती. काहींनी तिच्यासोबत फोटो आणि सेल्फी घेण्याची संधी साधली, शिल्पा नेहमीप्रमाणे सौम्य हास्याने सर्वांना अभिवादन करत पुढे सरकत होती. तिच्या उपस्थितीमुळे मंदिर परिसरात उत्साहाचं वातावरण होतं.
दरम्यान साई दर्शनानंतर शिल्पाने प्रसारमाध्यमांशी थोडक्यात संवाद साधला. “प्रत्येक वेळेस इथं आलं की एक वेगळीच शांतता मिळते. साईबाबांचं दर्शन म्हणजे आमच्यासाठी एक आत्मिक अनुभव असतो,” साई मंदिरात येताना खास करुन आपला आवडता गुलाबी अर्थात रानी रंगाचा ड्रेस घालून येत असल्याच देखिल ती म्हणाली.
पिंक ड्रेस बद्दल काय म्हणाली शिल्पा
ड्रेस कलर बद्दल पत्रकारांनी विचारले असता शिल्पा म्हणाली राणी पिंक माझा आवडता रंग असल्याने मी जेव्हा येथे येते तयार होऊन येते. आम्ही खूप प्रवास करून थकून आलो. मात्र येथे आल्यावर थकवा दूर झाला. बाबांनी शक्ती दिली. पैशांच्या व्यतिरिक्त बाबांनी भरपूर काही दिलं. जीवनात सुख महत्त्वाचं असतं. जीवनात जितके चढ उतार बघितले माझा अंधविश्वास म्हणा किंवा दृढ विश्वास मला माहित आहे जे काही होत आहे ते चांगल्यासाठीच होत आहे, अशी प्रतिक्रिया शिल्पा शेट्टी हिने माध्यमांशी बोलताना दिली आहे.
तिच्या गुलाबी पोशाखाबद्दल विशेष चर्चा रंगली होती. सुंदर साडीमध्ये ती पारंपरिक भारतीय सौंदर्याचं प्रतीक ठरत होती. अत्यंत साधेपणा मुळ तिचं रूप अधिकच खुलून दिसत होत.
शिर्डीतून बाहेर पडताना तिने साईंच्या गुरुस्थानी असलेल्या निम वृक्षाची पाने पुजाऱ्यांकडून प्रसाद म्हणून घेतली.
शिल्पा शेट्टीची ही भक्तिभावाने ओतप्रोत असलेली यात्रा केवळ सेलिब्रिटी दर्शनापुरती मर्यादित राहिली नाही, तर तिच्या कुटुंबीयांसोबत घडलेल्या या अनुभवाने एक आध्यात्मिक आणि प्रेरणादायी संदेश दिला.
या संपूर्ण घटनेवर आधारित व्हिडिओ आणि फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून, शिल्पाच्या भक्तिभावाने अनेकांना साईबाबांच्या भक्तीत रंगवून टाकलं आहे. तिची ही शिर्डी यात्रा अजून कितीतरी दिवस चाहत्यांच्या चर्चेचा विषय ठरणार, यात शंका नाही.