श्रीरामपुर : अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर शहरात अकरा वर्षीय अल्पवयीन मुलावर 9 जणांनी मिळून अनैसर्गिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडलीये. अल्पवयीन मुलासोबत हे घृणास्पद कृत्य करणारेदेखील अल्पवयीनच आहेत.
या अत्याचार प्रकरणी श्रीरामपुर शहर पोलिसांनी दिलेल्या माहीतीनुसार पीडित मुलाच्या आईने श्रीरामपुरात शहर पोलीसात फिर्यादी दाखल केली असून संशयित आरोपींची चौकशी सुरु असल्याच पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांनी सांगितले.
अत्याचार करणार्या 9 जणांनी 11 वर्षीय मुलास धमकावले होते. त्यामुळे तो घाबरला होता. मानसिक तणावाखाली असणार्या त्या मुलाकडून पालकांनी माहिती घेतल्यानंतर अत्याचाराचा प्रकार समजला. त्यानंतर त्या मुलाच्या आईने पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.