राहाता ( अहिल्यानगर) : शिर्डी- राहाता रोडवरील साकुरी हद्दीतील हॉटेल उत्सव येथे पोलिसांनी मोठी कारवाई करत ऑनलाइन हाय प्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केलाय. हॉटेल उत्सव येथे अनेक दिवासापासून ऑनलाइन एक्सॉर्ट सर्व्हिस चालवली जात होती.. या मध्यमातून सोशल मिडीयाच्या आधार महिलाचे फोटो पाठवत मोठी रक्कम घेतली जात होती. पोलिसांनी या ऑनलाइन व्यवसाय चालवणा-या मोहरक्या नानासाहेब जगन्नाथ शेळके, हॉटेल मॅनेजरला या दोघांनी जेरबंद केलय. तर एका पिडीतेची सुटका करण्यात पोलीसांना यश आले आहे.
डमी ग्राहकाच्या माध्यमातून म्होरक्या जाळ्यात
हॉटेल उत्सव येथिल ऑनलाईन सेक्स रॅकेटबाबत पोलीसांना अनेक दिवसापासून माहिती मिळत होती. मात्र मोहरक्या हाती लागत नव्हता तसेच ठोस पुराव्याअभावी कारवाई करता येत नव्हती. अखेर पोलिसांनी डमी ग्राहक पाठवून सापळा रचला. डमी ग्राहकाने संपर्क साधून सेवा बुक करताच ठरलेल्या वेळेनुसार पोलीस पथकाने हॉटेल उत्सववर छापा टाकत एक्सॉर्ट चालक आणि हॉटेलचा मॅनेजर याला ताब्यात घेतलय.. तर पिडीत महिलेची सुटका करण्यात आलीये.तर हॉटेल उत्सववर पिटा अंतर्गत ही कारवाई करण्यात आल्याच पोलीसांकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
शिर्डीसह परिसरात ऑनलाइन वेश्या व्यवसाय
शेळके हा अनेक दिवसांपासून ऑनलाईन एस्कॉर्ट सर्व्हिसच्या माध्यमातून वेश्याव्यवसाय चालवत होता. विविध वेबसाईट्स आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर जाहिरात करत महिलांची उपलब्धता, सेवा आणि दर यांची माहिती दिली जात होती. तर या प्रकरणी दोघांना ताब्यात घेण्यात आले असून यातील हॉटेल मालकाचा सहभाग आहे का याबाबत शाहनीशा करुन मालकावर देखिल कारवाई केली जाणार असल्याच पोलिसांनी स्पष्ट केलय.. पोलिसांच्या या धडक कारवाईमुळे हॉटेलवर वे़श्या व्यवसाय चालवणारे तसेच ऑनलाइन सेवा पुरवणा-याचे धाबे दणाणले आहेत.