महाराष्ट्र शासनाने “घर घर संविधान अभियान चालू केले आहे. संविधांचे महत्व, त्यातील मूल्य आणि त्याची अंमलबजावणी याबाबत शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये तसेच भावी नागरिकांमध्ये जागरुकता वाढविण्यासाठी 1332 विद्यार्थ्यांच्या मानवी साखळीने संविधान पुस्तक प्रतिकृती व 125 फुट डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची रांगोळीमध्ये पाठमोरी प्रतिमा काढण्यात आली. संविधान पुस्तक प्रतिकृती पाहण्यासाठी मोठी गर्दी झाल्याचं देखिल यावेळी दिसून आल.
संविधानातील मूलभूत हक्क, कर्तव्य आणि विविध तरतुदींचे शिक्षण देणे ज्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रीय एकात्मता आणि सामाजिक न्यायाची भावना रुजवणे, भारतीय संविधानातोल समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही मूल्यांचा प्रचार व प्रसार करणे ज्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये विविधतेतून एकता आणि समता या संकल्पनांचा विकास होईल विद्यार्थ्यांना संविधानाच्या अध्ययनामुळे आणि चर्चेद्वारे त्यांच्या सामाजिक, आर्थिक आणि राजकीय अधिकाराची जाणीव करून देणे आणि त्यांच्या जबाबदाऱ्यांचे पालन करण्यासाठी प्रेरित करणे हीच यातून माफक अपेक्षा.
प्राचार्य मा.साहेबराव कोल्हे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. ही संकल्पना विद्यालयातील क्रीडाशिक्षक बाळासाहेब कांडेकर व कलाशिक्षक सत्यानंद कसाब यांनी साकारली त्यांना प्रा. भीमराज काकड, पोपट दये, विकास पवार, भारत सोनवने. सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहकार्य केले. रांगोळी काढण्यासाठी विद्यालयाचा माजी विद्यार्थी वैभव थोरात व प्रियंका दामले, समुद्धी थोरात, जानव्ही थोरात, खुशाली खुरसने, कल्याणी इंगळे, जाधव यांनी सहकार्य केले.